छ.संभाजीनगर : ‘पीएमएफएमई’ योजनेअंतर्गत बॅंकांकडील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची बॅंकांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्वरीत निपटारा करुन त्याचे निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील बॅंकेच्या अधिकाऱ्या
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची बॅंकांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्वरीत निपटारा करुन त्याचे निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बॅंकांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. बैठकीस कृषी उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात प्रथम आला आहे,असे कृषी उपसंचालक दीपक गवळी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये पुन्हा देशामध्ये प्रथम येण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. बँकस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे निराकरण करुन संबंधित बँकांनी प्रकरणे निकाली काढावी. मंजूर प्रकरणांची माहिती नियमानुसार पोर्टलवर अपलोड करावी. या वर्षीही छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत उपस्थित सर्वांना सूचना दिल्या. तसेच यामध्ये अनावश्यक दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे सूचित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande