
नांदेड, 29 ऑक्टोबर, (हिं.स.) - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी त्यांचे नांदेड येथे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी एस.पी. अबिनाश कुमार यांच्या माध्यमातुन चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहीती दिली व पोलीस अधीक्षकांनी बाळासाहेबांना एक पुस्तक भेट दिले.नांदेड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना यश मिळाले. त्यांनी विविध उपक्रम पोलीस दलात राबवले आहेत त्याची माहिती त्यांनी दिली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis