पुणे : मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर बालेवाडीत चार पार्किंग
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याचा बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार अ
Metro Train


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याचा बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार असून, त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे.हिंजवडी- शिवाजीनगर या मेट्रोचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून दोन ते तीन महिन्यात हिंजवडी ते बाणेर मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर वर्षभरात हा संपूर्ण मार्ग सुरू होणार आहे.बाणेर, बालेवाडी या भागातून हिंजवडी आयटी पार्क मध्य नोकरीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. हे नागरिक मेट्रोने हिंजवडीला जात असले तरी बाणेर, बालेवाडी परिसरात पार्किंगची व्यवस्था आवश्‍यक आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून ८ जागांची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यावर चर्चा करून महापालिकेने सध्या चार जागा पीएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande