सर्वात कमी दराने ठेकेदारांना काम करावे लागेल
पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। बायोमायनिंग (जैविक उत्खनन) निविदेसाठी पाच निविदा काढल्या आहेत. यात जी निविदा सर्वात कमी दराने येणार आहे त्याच दराने पाचही ठेकेदारांना काम करावे लागले. त्यांच्याकडील तंत्रज्ञान कसे आहे याची तपासणी केली जाईल, तसेच दैनंद
सर्वात कमी दराने ठेकेदारांना काम करावे लागेल


पुणे, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। बायोमायनिंग (जैविक उत्खनन) निविदेसाठी पाच निविदा काढल्या आहेत. यात जी निविदा सर्वात कमी दराने येणार आहे त्याच दराने पाचही ठेकेदारांना काम करावे लागले. त्यांच्याकडील तंत्रज्ञान कसे आहे याची तपासणी केली जाईल, तसेच दैनंदिन कामावरही नियंत्रण ठेवले जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जैविक उत्खननाच्या निविदेवर ठेकेदारांचा डोळा, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक भूमिका घ्यावी लागणार असे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच प्रकाशित केले होते.फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ५९ लाख मेट्रिक टन कचरा पडलेला असून, त्यापैकी २०२३ पर्यंत २१ लाख मेट्रिक टनाचे बायोमायनिंग केले आहे.ऑगस्ट २०२४ मध्ये १० लाख मेट्रिक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी निविदा काढली आहे. हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यानंतर आता उर्वरित २८ लाख टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी पाच निविदा काढल्या जाणार आहेत. त्याच्या प्रस्तावास आयुक्तांनी मान्यता दिली असल्याने आता निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande