खरेदीखत रद्द करा;  सोलापुरातील जैन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। सकल जैन समाजाला अंधारात ठेवून महाराष्ट्र शासनासह धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून पुणे येथील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन वसतिगृहाची साडेतीन एकर जागा विश्वस्त मंडळाने विकासकाला विकली आहे. त्यामुळे जैन समाज आक्रोशित झाला
खरेदीखत रद्द करा;  सोलापुरातील जैन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। सकल जैन समाजाला अंधारात ठेवून महाराष्ट्र शासनासह धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून पुणे येथील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन वसतिगृहाची साडेतीन एकर जागा विश्वस्त मंडळाने विकासकाला विकली आहे. त्यामुळे जैन समाज आक्रोशित झाला आहे. लबाडीने झालेले जागा विक्रीचे खरेदीखत रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील सकल जैन समाजातर्फे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आले.समाजाला विश्वासात न घेता, हिराचंद नेमचंद संस्थेची गैरमार्गाने कवडी मोल भावात विक्री करण्यात आली आहे. याविरोधात जैन धर्मगुरूंसह समस्त जैन समाजात तीव्र संतापाची भावना आहे. या व्यवहारातील विकासक व विश्वस्त यांच्यात झालेले खरेदीखत रद्द करावे. व्यवहार रद्द करण्याची विनंती करणारा ई-मेल पाठविला असला तरी जोपर्यंत सरकार बोर्डिंगच्या जागेवर ट्रस्टचे नाव पुन्हा लावत नाही, तोपर्यंत समाजाचा लढा संपणार नाही. सरकारने १ नोव्हेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जैन समाजाने निवेदनाद्वारे दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande