आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नती
सोलापूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’चे बंधन घातले आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी होणारी पदोन्नती थांबली आहे.
आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नती


सोलापूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’चे बंधन घातले आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी होणारी पदोन्नती थांबली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरात होणाऱ्या ‘टीईटी’साठी खुद्द लाखभर शिक्षकांनी देखील अर्ज केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मार्ग काढला जाईल, अशी आशा शिक्षकांना आहे.

काही शिक्षक संघटनांनी निर्णय रद्द करावा म्हणून आंदोलने देखील केली आहेत. मात्र, केंद्र शासनाची भूमिका व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, यावर राज्य शासनाला मार्ग काढता येणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावीच लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिल्यास पुढच्या शैक्षणिक वर्षात दोनवेळा ‘टीईटी’ घेतली जाऊ शकते. त्यात संबंधित शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande