
येवला, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
- शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या सुरत येथील भाविकांवर काळाने घाला घातला असून येवल्याच्या एरंडगाव रायते शिवारात नाशिक संभाजीनगर महामार्गावर GJ O5 RJ 8909 कारचा भीषण अपघात झाल्याने या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामध्ये फॉर्च्यूनर कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातातील जखमींवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असून तीन मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV