अमरावतीत 'भगवान बिरसा कलासंगम' स्‍पर्धेचे बक्षिस वितरण थाटात
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) विदर्भ हा कला, संस्‍कृती व परंपरेने नटलेला प्रदेश असून निसर्गाच्‍या सान्निध्‍यात राहणा-या आदिवासी बांधवांनी अत्‍यंत सहजपणे या संस्‍कृती व परंपरांचे संवर्धनाचे अतिशय महत्‍वाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वय
आदिवासींनी संस्कृती संवर्धनाचे महत्‍वाचे कार्य केले – चंद्रशेखर भोंदू  'भगवान बिरसा कलासंगम' स्‍पर्धेचे बक्षिस वितरण थाटात


अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) विदर्भ हा कला, संस्‍कृती व परंपरेने नटलेला प्रदेश असून निसर्गाच्‍या सान्निध्‍यात राहणा-या आदिवासी बांधवांनी अत्‍यंत सहजपणे या संस्‍कृती व परंपरांचे संवर्धनाचे अतिशय महत्‍वाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती विभागाचे संचालक चंद्रशेखर भोंदू यांनी केले.

आदिवासी एकता मित्र मंडळ, स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त अमरावती येथे विभागीय स्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या 'भगवान बिरसा कलासंगम' या राज्यस्तरीय आदिवासी कला स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले. महर्षी पब्लिक स्कूल येथे झालेल्‍या या कार्यक्रमात ते अध्‍यक्षस्‍थानावरून बोलत हेाते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती महानगर संघचालक उल्हास बपोरीकर, अप्पर आयुक्त कार्यालय सहायक आयुक्त ममता विधळे, प्रकल्प अधिकारी पुसद अमोल मेतकर, माजी सैनिक दीपक आत्राम, नंदू भिलावेकर, रेखा मावसकर, महर्षी पब्लिक स्‍कूलचे संचालक प्रशांत राठी, लक्ष्‍मणराव मानकर ट्रस्‍टचे सचिव प्रशांत बोपर्डीकर यांची उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नृत्‍य, गायन, वादन, चित्रकला व हस्‍तकला स्‍पर्धेतील विजेत्‍यांना बक्षिसे वितरीत करण्‍यात आली. उल्‍हास बपोरीकर म्‍हणाले, कला ही मनोरंजन, कौशल्‍य, अर्थार्जन, समाधानाचे माध्‍यम असून यातून आत्‍मानंददेखील मिळतो. कलेची साधना करणा-या आदिवासी बांधवांना ही जीवनात पुढे नेण्‍यासाठी, त्‍यांच्‍यामध्‍ये बंधूभाव, एकता, संघटन निर्माण करण्‍यासाठी मदत करते. कलेच्‍या माध्‍यमातून स्‍वप्‍न साकार केली जाऊ शकतात व देशाची सेवादेखील केली जाऊ शकते, असे ते म्‍हणाले. यावेळी दीपक आत्राम यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. प्रशांत बोपर्डीकर यांनी प्रास्‍ताविकातून मानकर ट्रस्‍टच्‍या कार्याचा आढावा घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande