सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अमरावतीत “वॉक फॉर युनिटी” चे आयोजन
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . ही पायी फेरी दि. २९ ऑक्टोबर २०
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “वॉक फॉर युनिटी” — अमरावती पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजन


अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . ही पायी फेरी दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, अमरावती येथून सुरू करण्यात आली. या फेरीचा मार्ग सुंदरलाल चौक, मा. जिल्हा न्यायालय, मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, गर्ल्स हायस्कूल चौक व पोलीस पेट्रोल पंप असा होता. शेवटी पोलीस कवायत मैदानात ही फेरी समाप्त करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याच्या आणि बळकट करण्याच्या संकल्पनेला बळकटी देणे आहे. या निमित्ताने नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचविणे आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हे उद्दिष्ट आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी या फेरीला हिरवी झेंडी दाखवली. शहरातील विद्यार्थी, महिला व पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने या “वॉक फॉर युनिटी” मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होते.या उपक्रमाद्वारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील महान कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande