परभणी : येलदरी जलाशयातून ‘पूर्णे’च्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली असून त्यामुळे पाटबंधारे खात्याने येलदरीचे 1 व 10 हे दोन दरवाजे 0.5 मीटरने उचलून पूर्णा नदीच्या पात्रात 4 हजार 220
परभणी : येलदरी जलाशयातून ‘पूर्णे’च्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु


परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली असून त्यामुळे पाटबंधारे खात्याने येलदरीचे 1 व 10 हे दोन दरवाजे 0.5 मीटरने उचलून पूर्णा नदीच्या पात्रात 4 हजार 220 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे खात्याने त्या प्रकल्पाच्या 11 पैकी 7 दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ते पाणी येलदरीच्या जलाशयापर्यंत पोहोचले असून त्यामुळेच येलदरी जलाशयातील पाणी पातळी व पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याने या जलाशयाचे दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.सध्या या जलाशयात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विद्युत निर्मिती केंद्राकडेही 2 हजार 700 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande