
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
- पिंपळगाव बहुला, पेगलवाडी, महिरावणीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या विरोधात सुरू केलेल्या साखळी उपोषणास बसलेल्या आंदोलकांची आमदार सीमा हिरे यांनी भेट घेतली. महानगर विकास प्राधिकरण प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली नाशिक -त्र्यंबकेश्वर रोडलगतची घरे, दुकाने पाडण्याची कारवाई निषेधार्ह असून गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करू, अशी ग्वाही सीमा हिरे यांनी दिली.
आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या यांची भेट घेतल्यावर तात्पुरत्या पिंपळगाव स्वरूपात अतिक्रमण मोहीम थांबविण्याचे आदेश नाशिक रुंदीकरणासाठी बहुला ते पेगलवाडीदरम्यानच्या महामार्गालगतचे अतिक्रमण महानगर प्राधिकरणाला दिले होते. नाशिक महानगर प्राधिकरणाकडून काही दिवसांपासून मोहीम सुरू आहे. यामुळे बाधित गावातील गावकरी संतप्त आहेत. यासंदर्भात नाशिक आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी ही मोहीम कायमस्वरूपी थांबवावी या मागणीसाठी कैलास खांडबहाले, राजाभाऊ सारस्कर, शिवाजी भावले, भाऊसाहेब खांडबहाले, सोमनाथ खांडबहाले, बाबासाहेब पवार आदींनी महिरावणी शिवारात साखळी उपोषण सुरू केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV