अकोल्यात विविध पक्षातील 111 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
अकोला, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। सामाजिक समरसतेसह महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष–महायुती सरकार कार्यरत आहे. या लोकहितैषी कामगिरीमुळे विविध पक्षातील कार्यकर्ते मो
अकोल्यात विविध पक्षातील 111 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


अकोला, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

सामाजिक समरसतेसह महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष–महायुती सरकार कार्यरत आहे. या लोकहितैषी कामगिरीमुळे विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात दाखल होत आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात चित्राताई भांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील 111 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संतोष शिवरकर यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. डी. एम. भांडे, जयंत मसने, विजय अग्रवाल, माधव मानकर, अंबादास उमाळे, अॅड. रूपाली काकडे, राजेश नागमते, डॉ. किशोर मालोकार, देवेंद्र देवर, प्रवीण हगवणे, गणेश लोड, संजय कोरडे, वैभव तराळे, अरुण भांडे, दादाराव पेठे, उमेश भांडे, अनिल गावंडे, जयकुमार ठोकळ, राजेश बेले, डॉ. शंकरराव वाकोडे, विवेक भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आ. रणधीर सावरकर म्हणाले, “भाजपा येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या विश्वासाला न्याय देईल आणि सामाजिक कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळवून देईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला व महायुतीला निश्चितच विजय मिळणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “चित्राताई भांडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध समाजघटकांना जोडण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांवर न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ भाजपाला मिळेल.”

डॉ. डी. एम. भांडे यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्ष आदिवासी आणि कोळी समाजाच्या न्यायासाठी सातत्याने कार्यरत आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या समाजाचा पाठिंबा महायुतीसोबत ठामपणे राहील.” कार्यक्रमाचे संचालन अॅड. रूपाली काकडे यांनी केले. प्रास्ताविक संतोष शिवरकर यांनी तर आभार प्रदर्शन अंबादास उमाळे यांनी केले. चित्राताई भांडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात दाखल झालेल्या सर्व 111 कार्यकर्त्यांचे दुपट्टा परिधान करून मान्यवरांनी स्वागत केले. प्रवेशानंतर चित्राताई भांडे म्हणाल्या, “भारतीय जनता पक्ष हा सामाजिक समरसता आणि समाज परिवर्तनासाठी कार्य करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कोळी आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला आहे. आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदी बसवून मोदींनी खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे मी आणि माझे सहकारी भाजपा परिवारात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande