
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : निवडणूक आयोगाकडून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, एक नोव्हेंबर पासून नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. याकरिता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीत कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या चाचणीसह मतदार नोंदणीसाठी आज, गुरुवारी काँग्रेस भवन येथे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) तर्फे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली.या बैठकीस म. म. शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच वसंतराव पुरके, खासदार बळवंतराव वानखेडे,यशोमती ठाकूर,माजी आमदार विरेंद्र जगताप, व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, सुनील देशमुख, बबलुभाऊ शेखावत,मिलिंद चिमोटे,विलास इंगोले,अशोक अमानकर, प्रफुल मानकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी हरिभाऊ मोहोड, सुधाकरराव भारसाकळे,दयारामजी काळे, प्रकाशराव काळबांडे, बाळासाहेब हिंगणीकर, मुकद्दर खा पठाण, व्यासपीठावर उपस्थित होते.बैठकीत शिक्षक मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदार नोंदणी मोहिमेची आखणी आणि आगामी निवडणुकीसाठी ठोस रणनीती या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला प्रदीप देशमुख (सेवादल) प्रमोदराव दाळू, भैय्यासाहेब मेटकर, जयश्रीताई वानखडे, सतीशराव हाडोळे, श्रीकांत झोडपे, सेतू देशमुख, अजीज खान, राजाभाऊ टवलारकर, विनोद पवार, नामदेवराव तनपुरे, विनोद भालेराव, राजेशभाऊ काळे, नंदू यादव, वीरेंद्रसिंह जाधव,अमित गावंडे, अरविंद लंगोटे,समाधान दहातोंडे,रमेश सावळे,आतिश शिरभाते, किशोर देशमुख किशोर कीटुकले, प्रदीप देशमुख,अरविंद पखान, निखिलराव कोकाटे, वैभव वानखडे, साहेबराव भदे, ईश्वर बुंदिले, दीपक सवई,महेंद्रसिंग गेलवार, श्याम बेलसरे, सहदेव बेलकर, राजेश शेमलकर, भूषण कोकाटे पंकज विधळे, कलीम भाई, सलामउद्दीन शेख, अमोल देशमुख, नितेश वानखडे,सागर देशमुख, गजानन देशमुख, निशु जाधव,समीर पाटील, हिरालाल काशीकर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी