बीड - कवड गावातील ग्रामस्थांचे न्यायासाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन
बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कवडगाव गावातील काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष ज्योती विनायकराव मेटे यांनी आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात संवाद करुन दिला
अ


बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कवडगाव गावातील काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते.

यावेळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष ज्योती विनायकराव मेटे यांनी आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात संवाद करुन दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज जिल्ह्यातील कवडगाव येथे डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट ज्योती मेटे यांनी घेतली.

फलटण येथील त्यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी सखोल तपास करून दोषींविरोधात तत्काळ कार्यवाही करावी.

तसेच डॉ. संपदा मुंडे यांना कायमस्वरूपी न्याय मिळेल असेही शासनाने कालबद्ध कार्यवाही करण्याबाबत तपास यंत्रणेस आदेशित करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande