अमरावती : एकाच भागात पाच वेळा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला बिबट्या
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : महादेवखोरी परिसरातील वरूण नगर भागात २० ऑक्टोबरपासून एक मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले शिकाराच्या शोधात सतत फिरताना दिसत आहेत. या मादी बिबट्याला आणि तिच्या पिल्लांना पकडण्यासाठी वनविभागाने सलग पाच दिवस त्या परिसरात प
एकााच भागात पाच वेळा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली बिबट्या कुत्रे भुंकताच फटाके फोडून बिबट्यांना हाकलत आहेत नागरिक वरूण नगरमध्ये २० ऑक्टोबरपासून निर्माण झाली आहे दहशत


अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : महादेवखोरी परिसरातील वरूण नगर भागात २० ऑक्टोबरपासून एक मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले शिकाराच्या शोधात सतत फिरताना दिसत आहेत. या मादी बिबट्याला आणि तिच्या पिल्लांना पकडण्यासाठी वनविभागाने सलग पाच दिवस त्या परिसरात पिंजरा लावला जिथे बिबट्या दिसला होता, पण बिबट्या पिंजर्‍यात येत नाही. त्यामुळे परिसरातील लोक रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की फटाके फोडून बिबट्यांना पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर वनविभागाने रात्रीच्या वेळी गस्तही वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरूण नगर भागात सर्वप्रथम २० ऑक्टोबरच्या रात्री २.१६ वाजता मादी बिबट्याने एका कुत्र्याचा शिकार केला आणि तिथून पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्या बिबट्याच्या मागे एक कुत्राही काही अंतर धावताना दिसला.यानंतर २५ ऑक्टोबरच्या रात्री १.५७ वाजता तीच मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले त्या भागात पुन्हा शिकाराच्या शोधात फिरताना दिसली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ ऑक्टोबरला रात्री १.०७ वाजता तीच बिबट्या आणि तिची दोन पिल्ले त्याच परिसरात दिसली.

त्यानंतर २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता काही लोकांना बिबट्या दिसला, आणि त्याच रात्री १.५० वाजता बिबट्या आणि तिची दोन पिल्ले पुन्हा त्या भागात फिरताना दिसली, तसेच २.०८ वाजता हे बिबट्याचे कुटुंब पुन्हा परतताना सीसीटीव्हीमध्ये दिसले.

वनविभागाने वरूण नगर परिसरात बिबट्या आणि तिची पिल्ले ज्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, त्या सर्व फुटेजची नोंद घेतली आहे.

पकडण्यासाठी वाढवली गस्त

याबाबत वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर म्हणाले की,वरूण नगर भागात एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या आणि तिची दोन पिल्ले पाच वेळा कैद झाली आहेत. त्यामुळे आता बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की लोक फटाके फोडून बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने आपली गस्त वाढवली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande