म्हसळा ठाण्यात नवे नेतृत्व : रविंद्र पारखे यांनी घेतला पदभार
रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।म्हसळा पोलीस ठाण्यात नव्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र पारखे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची बदली पालघर येथे झाली असून त्यांच्या जागी पारखे यांची नि
म्हसळा ठाण्यात नवे नेतृत्व : रविंद्र पारखे यांनी घेतला पदभार


रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।म्हसळा पोलीस ठाण्यात नव्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र पारखे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची बदली पालघर येथे झाली असून त्यांच्या जागी पारखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पारखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

रविंद्र पारखे हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक अनुभवी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी पालघर, धुळवड, विक्रमगड आदी ठिकाणी जबाबदारीची पदे सांभाळत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुन्हेगारीविरुद्ध कठोर भूमिका, दक्षता आणि लोकसंपर्क यासाठी त्यांची विशेष ख्याती आहेपदभार स्वीकारल्यानंतर पारखे म्हणाले, “संदीप कहाळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच मीही जनतेच्या विश्वासास पात्र राहील, असा प्रयत्न करेन. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सर्वांच्या सहकार्याने नक्कीच साध्य होऊ शकते. कायदा हा सर्वांपेक्षा मोठा आहे आणि आपण सर्वांनी मिळून चांगुलपणाचा सेतु बांधूया,” असे त्यांनी सांगितले.म्हसळ्यातील नागरिक, व्यापारी वर्ग आणि सामाजिक संस्थांनी नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीवर अधिक नियंत्रण मिळवले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande