वरूडमध्ये ८८ वर्षानंतर अनु. जमातीच्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची संधी
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) या ८८ वर्षाच्या कालावधीत सहा महिलांनी नगराध्यक्षपद भूषविले. सर्वाधिक सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची राहिली. काही पंचवार्षिक योजना शिवसेना व भाजपच्या वाट्याला आल्या. डिसेंबर २०२१ पासून प्रशासक राज असल्याने त
८८ वर्षानंतर अनु. जमातीच्या व्यक्तीला संधी वरूडचा नगराध्यक्षपदाचा इतिहास


अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.)

या ८८ वर्षाच्या कालावधीत सहा महिलांनी नगराध्यक्षपद भूषविले. सर्वाधिक सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची राहिली. काही पंचवार्षिक योजना शिवसेना व भाजपच्या वाट्याला आल्या. डिसेंबर २०२१ पासून प्रशासक राज असल्याने तब्बल पाच वर्षानंतर सार्वत्रिक निवडणुका होणार असून स्वातंत्र्यानंतर तब्बल ८८ वर्षानंतर नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला आले आहे. त्याकरिता राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची शोध मोहीम सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीकरिता राखीव आल्याने अनेकांचे स्वप्न अधुरे राहिले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शरद पवार राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांची थेट लढत होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

या निवडणुकीत नवख्या आणि ज्येष्ठ कार्यकत्यांना उमेदवारी मिळण्याची संभावना वर्तवली जात आहे. अनेक महिलांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय वर्चस्व टिकविण्याची संधी मिळाली आहे. २०१६ मध्ये बहुमताने भाजपच्या स्वाती आंडे या महिला नागरिकाचा मागास प्रवर्ग आरक्षणातून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. परंतु यावेळी १३ प्रभाग २६ सदस्य असलेल्या वरूड नगर परिषदेत थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून रिंगणात भाजप, आघाडी व अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारात थेट समोरासमोर लढत होणार आहे. अजित पवार तसेच शिवसेना शिंदे गट तसेच इतर आघाड्या या पक्षांमध्ये युती होण्याची संभावना आहे. या निवडणुकीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्या पृष्ठभूमीवर राजकीय पक्षात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande