
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण जोर पकडत असताना अकोला पूर्व मतदारसंघात भव्य राजकीय हालचाल घडली आहे. निर्णायक मतदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी महादेव कोळी विकास जमात संघाने भाजपचा झेंडा हाती घेतला असून, त्यामुळे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात माजी राज्यमंत्री दशरथ भांडे यांची सून व माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा भांडे यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे रेलेश्वर महादेव संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव घुगरे, तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेशाची घोषणा केली.
सध्या जिल्हा परिषदेत भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी आगामी निवडणुकांत सत्ता काबीज करण्याच्या तयारीत पार्टी दिसत आहे. त्यामुळे पक्षात 'इनकमिंग'चे प्रमाण वेगाने वाढले असल्याचे स्पष्ट दिसते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे