“माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थींसाठी नि:शुल्क ई-केवायसी शिबिर
अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. या कालावधीत शहरातील सेतू सुविधा केंद्रांवर
“माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थींसाठी नि:शुल्क ई-केवायसी शिबिर


अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. या कालावधीत शहरातील सेतू सुविधा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत असून, केंद्रातील नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. महिलांच्या सोयीचा विचार करून आणि लोकनेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शासनाच्या “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी महिलांसाठी नि:शुल्क ई-केवायसी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थी महिलांना नि:शुल्क ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून दिली जाणार आहे. महिलांनी शिबिरात येताना स्वतःचे तसेच पतीचे किंवा वडिलांचे आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. दोन्ही आधारकार्डचे प्रमाणीकरण यशस्वी झाल्यास ई-केवायसी प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली जाईल. सेतू केंद्रांवरील वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय आणि सुलभतेने मिळावा हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू आहे. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व लाभार्थी महिलांना या नि:शुल्क शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande