
अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना केली असून देशभरातील प्रत्येक गावामध्ये शहरांमध्ये या दृष्टीने अमृत भारत योजना सारख्या योजना सुरू केले आहे ग्रामीण भागातील खारपाण, पट्ट्यामध्ये नियमित स्वच्छ पाणी मिळावा या दृष्टीने राज्य शासन कटिबद्ध असून राज्य शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या दृष्टीने केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक योजना सुरू असून64 खेडी योजना च्या माध्यमातून पाणीचे स्तोत्र च्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुरावाने 64 खेडी योजनेच्या घुसर संप वर पाणी सुरळीतपणे पोहचल्यामुळे ६४ खेडी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सर्व गावांना शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत अकोला तालुका अंतर्गत खांबोरा ६० खेडी व बोरगाव मंजू ४ खेडी अशी एकूण ६४ खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजने करिता योजनेची दुरुस्ती कामे, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. या योजनेमध्ये सुकडी जलशुद्धीकरण केंद्र येथून धोतर्डी पर्यंत वर 500 मी मीटर व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली तसेच ७ ठिकाणी उंच पाण्याच्या साठवणूक टाक्या व ५१ गावातील वितरण व्यवस्था तसेच खांबोरा, घुसर येथील पंपिंग मशिनरी इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सातत्याने सातत्याने अठरा तास जनतेच्या समस्या निराकरणासाठी समाजकारण आणि मानवतेचे कार्य आमदार सावरकर सत्ताही साधन नव्हे तर साध्य असून जनतेला गेल्या वीस वर्षाचा ॲप लॉक अकरा वर्षांमध्ये त्यांनी भरून काढून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.
श्री चळवळ शेतकरी चळवळ तसेच ग्रामीण समस्या ग्रामीण जीवनामध्ये लहानातले मोठे झाल्यामुळे अभियंता असलेले आमदार सावरकर नियोजनबद्ध प्रत्येक क्षेत्राचा सर्व स्पर्शी विकास करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून अकोला पूर्वचा विकास करत आहे.
प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्या करिता आमदार रणधीर सावरकरांनी जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांची दि. 11 ऑगस्ट 25 तसेच दिनांक 11 आक्टोंबर, दि. 28 आक्टोंबर 25 रोजी सतत आढावा बैठक घेऊन प्रत्येक बैठकीत मागील झालेल्या कामाचा आढावा घेतला व पूर्तता तसेच पुढे येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजून त्यावर उपाययोजना करण्याची निर्देश दिले आमदार रणधीर सावरकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व तांत्रिक अधिकारी, कंत्राटदार ,तांत्रिक सल्लागार संस्था, यांनी योजनेच्या प्रत्यक्ष कामातील अडचणी दूर करून वितरण प्रणालीची चाचणी घेण्यात आली .सदर चाचणीअंती घुसर येथे पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून पुढे आगर, घुसर, आपातापा , गोपाळखेड, या सर्व गावांसह योजना क्षेत्रातील सर्व गावांना तसेच अस्तित्वात असलेल्या पाईपलाईनवरून यापुढे पळसो ,धोतर्डी, दहिगाव गावांना आवश्यक पाणीपुरवठा होणार आहे भविष्यात नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य झाला आहे, तसेच या योजनेमधील अपूर्ण कामे ज्यात मध्ये टाक्यांची दुरुस्ती , इतर किरकोळ कामे व काही ठिकाणी पाईपलाईन टाकने या सर्व कामाकरिता सुधारित अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकरांनी पाणी पुरवठा योजनेच्या अधिकारी यांना देण्यात आले , योजनेच्या सतत आढावा बैठकी घेतल्यामुळे व अधिकाऱ्यांना व तांत्रिक कर्मचारी यांनी दिलेल्या निर्देश प्रमाणे कामे केल्यामुळे ६४ गावातील नागरिकांची आमदार सावरकर यांच्या पुढाकाराने पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे, यावेळी आमदार सावरकर यांच्यासोबत जयंत बसणे राजेश बेले शंकरा वाकोडे अंबादास उमाळे अनिल गावंडे दिगंबर गावंडे संजय पाटील जयकुमार ठोकळतसेच सरपंच उपसरपंच आधी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे