
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, परभणी तर्फे परिषदेच्या ३३व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे होते. यावेळी सुरेश काळे, रामेश्वर आवरगंड, नगरसेवक पंजाब पतंगे, सुमित जाधव, वैभव शिंदे, बंडू माहेत्रे, बबन ढगे, संजय कुराडकर तसेच प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश जाधव आणि सोहम दुधारे उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि हरित परभणीचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis