सोयाबीन, मुग, उडीद उत्पादीत मालाच्या हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी !
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्रादेशानुसार राज्य शासनाकडून हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन, मूग व उडिद पिकांची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविणे सुरू करण्यात आले असून 30 ऑक्टोबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरू
सोयाबीन, मुग, उडीद उत्पादीत मालाच्या हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी !


अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्रादेशानुसार

राज्य शासनाकडून हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन, मूग व उडिद पिकांची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविणे सुरू करण्यात आले असून 30 ऑक्टोबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार रणधीर सावरकरांनी दिली आहे,

या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती व 30 ऑक्टोंबर रोजी पासून खरेदी सुरू होईल असे शब्द दिले होते त्या शब्दाला पूर्तता करून शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे सध्याच्या परिस्थिती संदर्भात उच्च स्तरावर आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या होत्या त्या संदर्भातला प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला केंद्रीय कृषिमंत्री नामदार व शेतकऱ्यांचे नेते शिवराज सिंग चव्हाण यांनी तत्काळ दखल घेऊन

उपरोक्त आदेशाचे पत्रान्वये प्रथमतः केंद्र शासनाने सोयाबीनसाठी १८,५०,७०० मे.टन, मूग ३३,००० मे.टन व उडिद ३,२५,६८० मे.टन खरेदी मंजूरी दिली आहे. याबद्दल आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, सहकार मंत्री जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त करून लवकरच या संदर्भात केंद्र वाढवण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय सरकार येईल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.

, हमीभाव योजनेंतर्गत दिनांक ३० ऑक्टोबरपासून दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व दिनांक १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९० दिवसांसाठी खरेदी सुरू करण्यात येत आहे, शेतकऱ्यांनी सोयाबीन उडीद मूग खुल्या बाजारात कमी न विकता शासकीय हमीभावाने विक्री करावी असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे, सोयाबीन खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत असून खरेदी प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून शासन आणि शेतकरी यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे त्याकरिता खरेदी केंद्र आणि गोडाऊन दोन्ही ठिकाणी नाफेड चे ग्रेडर नियुक्त करण्यात येणार आहेत मोठ्या प्रमाणात बारदाना, संकलन गोडाऊन याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली,

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande