
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून एकतेच्या धावेतून देशभक्तीचा संदेश दिला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून एकता दौड सुरू झाली. या दौडीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. आष्टीकरांनी मोठ्या उत्साहाने या दौडीत सहभाग नोंदवला. याप्रसंगी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, अंभोरा पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक मंगेश साळवे, नगराध्यक्ष जिया बेग, तसेच विविध अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, आष्टी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर पाटोदा,शिरूर (का.) या शहरातही एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis