
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा जिल्हाधिकारी बीड यांच्यासमोर जोरदारपणे मांडण्यात आला.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेतशेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवत जिल्हाधिकारी यांच्याशीसविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांनी तातडीच्या अडचणींचा पाढा वाचला.या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्याना तात्काळ भरपाई वाटप करण्याची मागणी केली. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन तांत्रिक अडचणी, खाते क्रमांक विसंगती आणि पंचनाम्यांतील त्रुटींमुळे भरपाई थांबलेली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मदत मिळेल,असे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis