
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना प्रती गोवंश पोषण आहार व विकास निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी नवोदय रामकृष्णहरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प.पू. श्री संदीपभाई शर्मा (भाईश्री) यांच्या नेतृत्वाखालील दिलेल्या निवेदनात गोशाळांना प्रतीदिन प्रती गोवंश ₹100 इतके अनुदान तात्काळ देण्यात यावे., सर्व गोशाळांसाठी अवसंरचना कोष (Infrastructure Fund) तयार करून चारा, पाणी, वैद्यकीय सेवा व आश्रयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी., राज्यातील सर्व गोशाळांना समान न्यायाने आर्थिक विकास निधी देण्यात यावा., लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दिवसाचे औचित्य साधून सर्व जीव सुरक्षित व सशक्त राहावेत, असा संदेश शासनाने द्यावा., ग्रामीण व शहरी भागातील गायरान जमीन गोसंवर्धनासाठी राखून ठेवावी. त्या जमिनीवर चारा लागवड, गोउद्योग यासाठीच वापर व्हावा आणि इतर विकास प्रकल्पांसाठी हस्तांतर होऊ नये., सर्व नोंदणीकृत गोशाळांना सौरऊर्जा (सोलार) सुविधा पुरवण्यात याव्यात., अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गोशाळांचे नुकसान झाले असून, पूर्वी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करूनही सहकार्य मिळालेले नाही. ते त्वरित मिळावे.,जिल्ह्यातील सर्व गोशाळांना तातडीने चारा उपलब्ध करून देण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या. या निवेदनाद्वारे संस्थेने शासनाच्या स्तरावरून गोसंवर्धन, गोपोषण आणि गोसेवा यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis