नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेची त्र्यंबकरोड परिसरात नवीन इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची पाहणी


नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेची त्र्यंबकरोड परिसरात नवीन इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात प्रशस्त पार्किंग आहे. तीन मजल्यांचे एकूण १ लाख ५१ हजार चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. लवकरच या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नवीन इमारतीला भेट देत तेथील नवीन सोयीसुविधांची माहिती घेत इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपअभियंता राजेंद्र मोरे, अभिजित बनकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande