
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी येथील अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांची पदोन्नती होऊन त्यांची छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात अप्पर आयुक्त (क्रमांक 1) या पदावर नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महापालिका आयुक्त नितिन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे तसेच विविध विभाग प्रमुख आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis