लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्याची काँग्रेसची मागणी
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्याने मदत पोचली पाहिजे, या सोबतच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीचे पंचनामे करून त्या संदर्भात देखील योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशा मागणीचे निवेदन लातूर जिल्हाधिका
शेतकरी


लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्याने मदत पोचली पाहिजे, या सोबतच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीचे पंचनामे करून त्या संदर्भात देखील योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशा मागणीचे निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज दिवाळीआधी मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार होते. तशी घोषणाही सरकारने केली होती. दिवाळी संपून आठवडा उलटला तरी अद्याप हे पॅकेज बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही.

याआधीही ऑगस्टपर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीबद्दल दसऱ्याआधी शेतकऱ्यांना निधी देणार, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. पण तीही मदत वेळेत व मुदतीत दिली नाही. सर्व निकष बाजूला ठेवून आम्ही मदत देणार, असे सरकार वारंवार सांगत असले तरी जाचक निकषांमुळे शेतकऱ्यांना मदत वेळेवर मिळत नसल्याचेच दिसून येत आहे.

सध्याच्या अडचणीच्या, आपत्तीच्या काळात वेळेवर शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर राज्य सरकार, प्रशासन शेतकरी बांधवांप्रती किती गंभीर आणि किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्याने मदत पोचली पाहिजे, या सोबतच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीचे पंचनामे करून त्या संदर्भात देखील योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande