अमरावती : एसआरपीएफ कॅम्प समोर बिबट्याने केली काळविटाची शिकार
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : चांदूररेल्वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्प पाचशे क्वॉर्टर परिसराच्या मुख्य प्रवेशव्दारसमोर बिबट्याने काळवीटची शिकार केली आणि शिकार केलेले काळविट जंगलात नेले. हे सर्व दृश्य काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपले. ही घटना
बिबट्याने केली काळविटाची शिकार  एसआरपीएफ कॅम्पच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरील घटना


अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : चांदूररेल्वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्प पाचशे क्वॉर्टर परिसराच्या मुख्य प्रवेशव्दारसमोर बिबट्याने काळवीटची शिकार केली आणि शिकार केलेले काळविट जंगलात नेले. हे सर्व दृश्य काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपले. ही घटना समोर आल्याने परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसआरपीएफ कॅम्प परिसरात सतत जवान गस्तीवर असतात. सकाळी व रात्रीलासुध्दा पूर्ण परिसरात गस्त असते. रात्रीला कॅम्प सुरक्षा पथक वडाळीपासून ते पाचशे क्वॉर्टरपर्यंत गस्त घालतात. तसेच आतील व बाहेरील भागातसुध्दा गस्त असते. २९ऑक्टोबरच्या रात्री २ ते २.३० च्या सुमारास सुरक्षा पथक वाहनाने गस्तीवर असताना पाचशे क्वॉर्टरसमोरील चांदूररेल्वेकडे जाणाऱ्या मार्गावर बिबट हा काळवीटची शिकार करताना दिसला. त्यांनी वाहन थांबविले.रस्ता दुभाजकाजवळून बिबट्याने ती शिकार तोंडात पकडून फरफटत जंगलात नेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण झाली.

एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट रात्रीला पाचशे क्वॉर्टर परिसरालगत फिरताना दिसतात. त्यामुळे मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande