
आमदार धस म्हणाले,माझी लेक माझा अभिमान
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश धस यांची लेक मैथिली हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पनवेल (कामोठे) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीमध्ये मैथिलीने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आणि आता ती गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, एक वडील म्हणून माझ्यासाठी हा केवळ अभिमानाचा क्षण आहेच, मात्र ही निवड तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि मेहनतीचा सुंदर पुरावा आहे. खेळाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करताना ती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे, ही गोष्ट संपूर्ण परिवारासाठी सन्मानाची आहे.
मैथिलीला मनःपूर्वक शुभेच्छा , तू अशीच खेळाच्या मैदानावर झळकू दे, महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचं नाव उज्ज्वल कर.!
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis