
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून उदगीर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा व स्मारक या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच विकासकामांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करत जनतेशी संवाद साधला.
प्राष्ट्रीय अध्यक्ष भदंत उपगुप्त महाथेरो, लातूर भिक्खू संघ भिक्खू दयानंद थेरो, राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपाई जोगेंद्रजी कवाडे साहेब, आयोजक आमदार संजय बनसोडे, श्रीमती शिल्पाताई संजय बनसोडे, गायक आदर्श शिंदे, पालकमंत्री गोंदिया इंद्रनील नाईक, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार गोविंदराव अण्णा केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे सावकार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव बेंद्रे, अफसर बाबा शेख, निवृत्तीराव कांबळे, बाळासाहेब सोळसकर, ब्रम्हाजी केंद्रे, रामचंद्र तिरुके, , चंद्रकांत टेंगटोल उपासक, उपासिका, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदगीरची पवित्र अशी भूमी. जिथे खऱ्या अर्थाने समतेचा वारसा आणि वसा जोपासला जातो. आपण सर्वजण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण सर्वजण वास्तव्यास आहात. आपण केवळ एक पुतळा उभारत नाही आहोत एका विचाराची मूर्त रूपात प्रतिष्ठा करत आहोत. हा पुतळा संघर्षाचा प्रतीक, स्वाभिमानाचा आवाज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जिवंत साक्षीदार. डॉ. बाबासाहेबांनी अंधारलेल्या समाजाला शिक्षणाचा दिवा दिला, असमानतेतून समतेचा मार्ग दाखवला, आणि अन्यायातून न्यायाच्या लढ्याची ज्योत पेटवली.
यावेळी बोलताना सहकार मंत्री पाटील म्हणाले की,त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करताना, आपण त्या प्रत्येक संघर्षाला नतमस्तक होत आहोत. ही स्मारकभूमी येणाऱ्या पिढ्यांना सांगेल की विचार कधी मरत नाहीत, संघर्ष व्यर्थ जात नाही, आणि सत्य, समता, बंधुता या मूल्यांवर उभा समाज नेहमीच अमर राहतो. तसेच विश्वशांती बुध्दविहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलॅण्ड आणि पार्क विकसीत करणे या कामाचे भूमिपूजन होत आहे. या विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा उपलब्ध होतील. त्याचबरोबर रस्त्यांच्या कामामुळे विकासाचा नवा अध्याय दिला जाणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis