
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कन्नड तालुक्यातील १० अंगणवाडी केंद्रांना प्रत्येकी ₹१ लाख ६४ हजार रुपयांची “स्मार्ट अंगणवाडी किट” प्रदान करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कन्नड तालुक्यातील दहा अंगणवाडी केंद्रांना हे स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती खासदार भुमरे यांनी दिली आहे.
या उपक्रमाद्वारे अंगणवाड्यांमध्ये डिजिटल शिक्षण साधने, स्मार्ट टीव्ही, शैक्षणिक खेळणी, आणि बालविकासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून मुलांचे शिक्षण अधिक मनोरंजक, सर्जनशील आणि प्रभावी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis