
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
आज फुलंब्री येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या. भारताची लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन फुलंब्री येथे करण्यात आले होते याप्रसंगी फुलंब्री तालुक्यातील अनेक नेते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
एकता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या विचाराचा संदेश देत हा एकतेचा सोहळा संपन्न झाला!
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis