विद्याधर भुस्कुटे लवकरच लातूरला येणार
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। एक पाऊल प्रेरणेकडे...डोंबिवलीतून सुरु होणारा विचारांचा प्रवास... महाराष्ट्राच्या मनात पोहोचणारा आहे....आरोहण, खोज...नव्या सोचची या संकल्पनेने प्रेरित होत, श्री. विद्याधर भुस्कुटे यांनी महाराष्ट्रातील एक अद्भुत प्रवास चौ
A


लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। एक पाऊल प्रेरणेकडे...डोंबिवलीतून सुरु होणारा विचारांचा प्रवास... महाराष्ट्राच्या मनात पोहोचणारा आहे....आरोहण, खोज...नव्या सोचची या संकल्पनेने प्रेरित होत, श्री. विद्याधर भुस्कुटे यांनी महाराष्ट्रातील एक अद्भुत प्रवास चौथी पदयात्रा...३२१५ किलोमीटर महाराष्ट्र प्रदक्षिणा चालू करणार आहेत. लवकरच विद्याधर भुस्कुटे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या यात्रेत ठाणेपासून सुरुवात होऊन पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि परत ठाणे...अशा ३० जिल्ह्यांचा हा अद्वितीय प्रवास आहे.या पदयात्रेच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते, ही केवळ यात्रा नाही, तर मानवतेचा, एकतेचा आणि प्रेरणेचा प्रवास आहे. आपल्या डोंबिवलीकरांचा अभिमान श्री. विद्याधर भुस्कुटे यांनी उचललेला हा महाराष्ट्र भ्रमणाचा ध्यास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande