सिल्लोडमध्ये महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (एमएसएसीएस) मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग दिशा, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजी नगर, प्रेरणा सामाजिक संस्था वैजापूर, संपूर्ण सुरक्षा केंद्र वैजापूर, व उपजि
आरोग्य तपासणी करून घ्यावी


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (एमएसएसीएस) मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग दिशा, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजी नगर, प्रेरणा सामाजिक संस्था वैजापूर, संपूर्ण सुरक्षा केंद्र वैजापूर, व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमानाने सिल्लोड शहरातील यशवंत नगर भागांत महा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदरील शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी रक्त तसेच क्षयरोग, कुष्ठ रोग, कर्करोग यासारख्या तपासण्या मोफत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande