धारणीत अवैध सागवान तस्करी प्रकरणी तिघांना अटक
अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। धारणी वनपरीक्षेत्रातील बैरागड व बोड वर्तुळात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल व तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धाड टाकून तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर जबाबदारी निश्चित अधिकाऱ्य
धारणीत अवैध सागवान तस्करी प्रकरणी तिघांना अटक


अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

धारणी वनपरीक्षेत्रातील बैरागड व बोड वर्तुळात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल व तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धाड टाकून तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर जबाबदारी निश्चित अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याला निलंबित करून एका करण्यात आले आहे.ही कारवाई वनपरीक्षेत्राधिकारी एल. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकाने छुप्या मार्गाने मध्यप्रदेशात सागवानाची तस्करी करणाऱ्या तस्करांना रंगेहात पकडले.

सेवाराम मोरे (२४) रा. खालवा, रमेश चव्हाण (२५) रा. चंबूतरा आणि कमलेश सोलंकी (२०) रा. बैरागड अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत या तिघांपैकी दोघे आंतरराज्य तस्कर असल्याचे निष्पन्न झाले असून, ते मेळघाटातून सागवान लाकूड अवैधपणे कापून मध्यप्रदेशात विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले आहे.

वनविभागाच्या पथकाने आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सागवानाचे ओडके, कत्तलीसाठी वापरलेली साधने आणि वाहतूक साहित्य जप्त केले आहे. प्रकरणाची पुढील संबंधितांवर वन कायद्यानुसार चौकशी सुरू असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी त्रुटी कर्तव्यदक्षतेत आढळल्याने एक अधिकारी व एक कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले असल्याचे वनविभागाकडून कळविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमीनी वनविभागाच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले असून, अवैध वृक्षतोडीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande