बीड पत्रकार मुलाच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करणार - आमदार धनंजय मुंडे
बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड शहरातील पत्रकार देवेंद्र सिंह ढाका यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क करून हत्या प्रकरणात योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे बीड श
अ


बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड शहरातील पत्रकार देवेंद्र सिंह ढाका यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क करून हत्या प्रकरणात योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे

बीड शहरातील पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांच्या यश या मुलांची बीड शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंडे यांनी

बीड शहरात ढाका परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.

तरुण उमद्या पोटच्या मुलाची हत्या झाल्याचे दुःख हे न पेलेवणारे आहे. त्यामुळे यश ढाका याला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत मी पूर्ण शक्तीने ढाका कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, असा शब्द ढाका कुटुंबीयांना दिला.

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, सुरू असलेल्या तपासाची माहिती घेतली. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याहीही चर्चा करणार आहे. असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande