- सहा नोव्हेंबर शेवटची तारीख
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे मतदारांनी सहा नोव्हेंबर पर्यंत आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात येत आहे
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन पदवीधर मतदारांची नव्याने मतदार नोंदणी सुरू झाली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्याने तयार करण्यात येते. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपले नाव असले तरी ते रद्द होतात म्हणून पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
मतदार हा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड बीड, लातूर, धाराशीव या 8 जिल्ह्यातील कोणत्याही वयाचा व कोणत्याही शाखेचा पदवीधर व रहिवासी असावा.
१ नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा पदवीधर असावा.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फॉर्म भरून आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जमा करावे.
भारतीय निवडणुक आयोगाचा नमुना अर्ज क्रं १८ भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत
विवाहित महिलांकरिता लग्नाचे प्रमाणपत्र / राजपत्र गॅझेट / पॅन कार्ड नोंदणीची मुदत ०६ नोव्हेंबर २०२५
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis