मोझरी गुरुकुंजात तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला तीर्थ स्थापनेने सुरुवात; लाखो भक्तांचा सहभाग
अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.) मोझरी गुरुकुंज येथे आज, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथी महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. या वेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली होती. सामूहिक ध्यान
मोझरी गुरुकुंजात तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला तीर्थ स्थापनेने सुरुवात; लाखो भक्तांचा सहभाग


अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.) मोझरी गुरुकुंज येथे आज, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथी महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. या वेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली होती. सामूहिक ध्यानानंतर श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते. त्यांनी लिहिलेली 'ग्रामगीता' ही ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी अर्पण केली होती. त्यांच्या भजनांमधून त्यांनी सर्वधर्म समभावाची अमूल्य शिकवण समाजाला दिली.

५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करतील. १२ ऑक्टोबर रोजी गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande