नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण जिल्ह्यातील खराब झालेलेसोयाबीनचे पीक घेऊन थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज देत शासनदरबारी थेट हाक दिली.
खासदार चव्हाण यांनी स्वतः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आपल्या सोबत घेऊन जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा स्पष्ट शब्दांत मांडत सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत जाहीर करावी.”या प्रसंगी खासदार चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनास निर्देश दिले की, पंचनामे वेगाने पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवावेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रितपणे तात्काळ मदत जाहीर करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.यावेळी नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमदार हणमतराव पाटील बेटमोगरेकर, निवासी जिल्हाधिकारी आंबेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis