जयपूरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर (हिं.स.) राजस्थानमधील जयपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एक्स वर पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर (हिं.स.) राजस्थानमधील जयपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एक्स वर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमधील जयपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या मृत्यूची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्स वर या घटनेवर शोक व्यक्त केला आहे, जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात लागलेली आग ही दुःखद आहे. स्थानिक प्रशासन बाधित रुग्णांची सुरक्षा, उपचार आणि काळजी सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande