नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेडचे श्री गुरु गोबिंदसिंगजी विमानतळ हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे संचालित विमानतळ म्हणून नागरी उड्डयन महासंचालनालयाकडून परवाना प्राप्त झाला आहे.
माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी आज ही माहिती दिली आहे नांदेड विमानतळाचा हा गौरव म्हणावा लागेल अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.शिर्डी आणि अमरावतीनंतर राज्य सरकारद्वारे चालविले जाणारे हे तिसरे विमानतळ आहे. हा परवाना प्राप्त झाल्यानंतर नांदेड विमानतळाचा विकास व नांदेडच्या विमानसेवेला नवी गती मिळणार आहे. नांदेडकरांची मागणी पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार चव्हाण यांनी आभार व्यक्त केले .
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis