बार्टीतर्फे आईजीटीआर कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्जप्रक्रिया सुरू
नागपूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि इंडो-जर्मन टूल रूम, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. य
बार्टीतर्फे आईजीटीआर कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्जप्रक्रिया सुरू


नागपूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि इंडो-जर्मन टूल रूम, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील एकूण ६१ आवश्यक कौशल्य प्रशिक्षणांचा समावेश आहे. प्रशिक्षण आणि प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.barti.in/ उपलब्ध आहे.

सदर प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क असून प्रशिक्षण, राहण्याची आणि जेवणाची सोय बार्टी, पुणे मार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्णवेळ असणार असून निवासी प्रशिक्षणाची सोय केवळ आयजीटीआर औरंगाबाद येथेच उपलब्ध आहे. तसेच पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूज उपकेंद्रात अनिवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

१८ ते ३० वयोगटातील अनुसूचित जातीतील गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावेत. ज्या प्रशिक्षण केंद्रात अर्ज केला जाईल, तेथेच पात्रता परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी होईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह स्वतःच्या खर्चाने कार्यक्रमस्थळी हजर राहावे लागेल.

विद्यार्थ्यांनी जाहीरातीत दिलेल्या QR कोड किंवा लिंकचा वापर करून आयजीटीआरच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख १० ऑक्टोबर आहे. पात्रता परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत यांची तारीख १५ ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे. बार्टी कार्यालयामार्फत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande