लातूर : आयटीआय परीक्षेत देशात द्वितीय आलेल्या विद्यार्थिनीचा आ. कराड यांच्या हस्ते सत्कार
लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।अखिल भारतीय व्यवसाय प्रशिक्षण (आयटीआय) तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत रेणापूर येथील स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री विभागात रेणापूर येथील कु. मदीया खदीर सय्यद या विद्यार्थिन
मदिया सय्यद हिचे आ. कराड यांच्याकडून अभिनंदन


लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।अखिल भारतीय व्यवसाय प्रशिक्षण (आयटीआय) तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत रेणापूर येथील स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री विभागात रेणापूर येथील कु. मदीया खदीर सय्यद या विद्यार्थिनीने ९९.६६ टक्के गुण घेऊन देशात द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाची दखल घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. अत्यंत अभिमानास्पद मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी कु. मदीया खदीर सय्यद या विद्यार्थिनीचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.

कु. मदीया खदीर सय्यद या विद्यार्थिनीचे वडिल बांधकाम कामगार आहेत. घरची परिस्थिती अगदी जेमतेम असून अशा प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थिनीने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपले आयटीआय मधील विजतंत्रीचे शिक्षण पूर्ण केले. कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांनी या गुणवंत विद्यार्थीनीस दिल्ली येथे झालेल्‍या चौथ्या दिक्षांत समारंभात कु. मदिया हिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा गौरव केवळ विद्यार्थिनीचा नसून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाबरोबरच संपूर्ण लातूर जिल्ह्याचा अभिमान वाढविणारा आहे. कु. मदीया खदीर सय्यद तिने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कु. मदीया सय्यद या विद्यार्थिनीचे वडील खदीर सय्यद, चुलते आजम सय्यद, सय्यद मुसा जमाल, आई सय्यद शाहीन खदीर यांच्यासह रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे शहराध्यक्ष अच्युत कातळे, दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, चंद्रकांत कातळे यांच्यासह इतर अनेक जण होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande