वाढदिवसावरील खर्च टाळून अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा - डॉ. राहुल पाटील
परभणी, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। यंदा अतिवृष्टीमुळे शेती पिकांची अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवाढव्य खर्च न करता अतिवृष्टीग्रस्तांना मदत करावी असे आवाहन आमदार डॉ.
वाढदिवसावरील खर्च टाळून अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा : डॉ. राहुल पाटील यांचे आवाहन


परभणी, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। यंदा अतिवृष्टीमुळे शेती पिकांची अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवाढव्य खर्च न करता अतिवृष्टीग्रस्तांना मदत करावी असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

आ. डॉ. पाटील यांचा 14 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने कार्यकर्ते पदाधिकारी विविध उपक्रमाचे आयोजन करतात परंतु, यंदा अतिवृष्टी झाली. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कुणीही वाढदिवसासाठी खर्च करू नये, बॅनर, हार तुरे, शाल श्रीफळ किंवा भेटवस्तू न देता त्या ऐवजी अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना आपापल्या परीने मदत करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्यामुळे आपण परभणीतून तिसर्‍यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकलो.दरवर्षी माझा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होतो. परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने शुभेच्छा देत असतात परंतु, यंदा परिस्थिती वेगळी आहे. मायबाप शेतकरी संकटात आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेवून कोणताच खर्च करू नये, आपल्या शब्दसुमनाने दिलेल्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करु. शक्य तेवढी शेतकरी आणि अतिवृष्टी भागातील विद्यार्थी यांना मदत करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande