छ. संभाजीनगर - सिल्लोड शहरातील प्रवेशद्वारावर राजमाता जिजाऊचे नाव देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)सिल्लोड शहरातील प्रवेशद्वारावर राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे..अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.असा इशारा बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनेने दिला आहे सिल्लोड शहरातील जुन्या गावात येथील जुन्या जाणत्या जेष्ठ शिवप्रेमी
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)सिल्लोड शहरातील प्रवेशद्वारावर राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे..अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.असा इशारा बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनेने दिला आहे

सिल्लोड शहरातील जुन्या गावात येथील जुन्या जाणत्या जेष्ठ शिवप्रेमींनी पन्नास वर्षांपूर्वी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. हिंदूंच्या विविध उत्सवाच्या दरम्यान जसे की गणपती शिवजयंती, छत्रपती संभाजीराजे जयंती आदि उत्सव साजरे करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका याच प्रवेशद्वारातुन जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारास “राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार” असे नामकरण करण्याची मागणी सिल्लोड शहरातील नागरिक मागच्या अनेक महीण्यांपासुन करीत आहेत. यापुर्वी भाजपाचे माजी शहराध्यक्ष कमलेश कटारीया, नगरसेविका रुपालीताई मनोज मोरेल्लू यांनी राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार नाव देण्याची मागणी केलेली आहे. तरीही सिल्लोड नगरपरिषद या मागणीचा विचार करीत नसुन, राजमाता जिजाऊ नाव देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी राजमाता जिजाऊ यांचे नाव सदरील प्रवेशद्वारास न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन .मुख्याधिकारी नगरपरिषद सिल्लोड श्री.कारभारी दिवेकर यांना आज बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटना तसेच शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande