सोलापूर - मंदिरातील चोरीला गेलेल्या आठ मूर्ती 12 तासांत हस्तगत
सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - शहरातील विजापूर रोडवरील जैन मंदिर आणि धानम्मा मंदिरातील चोरीस गेलेल्या मूर्ती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांत हस्तगत करीत तीन आरोपींना अटक केली. याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेत
newssss


सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - शहरातील विजापूर रोडवरील जैन मंदिर आणि धानम्मा मंदिरातील चोरीस गेलेल्या मूर्ती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांत हस्तगत करीत तीन आरोपींना अटक केली. याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले

शहरातील विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिर येथून पंचधातूच्या मूर्ती, रोख रक्कम असा एक लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. त्याच दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिरा समोरील धानम्मा देवी मंदिर येथून मूर्ती आणि सहा हजार रुपये रोख चोरीस गेले होते.

याबाबत शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाला सूचना केल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande