भाजपची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी नाशकात बैठक
नाशिक, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्याकरता भाजपची विशेष बैठक शुक्रवारी नाशिक मध्ये आहे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी द
भाजपची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी नाशकात बैठक


नाशिक, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्याकरता भाजपची विशेष बैठक शुक्रवारी नाशिक मध्ये आहे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

नाशिक मध्ये शुक्रवारी होऊ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता चाचपणी करावी त्याचबरोबर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून सध्याची परिस्थिती आणि एकूणच माहिती घेण्याकरता भाजपाची बैठक नाशिक मधील स्वामीनारायण हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नगर नंदुरबार या जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रावल , राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह आमदार खासदार व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार असून बैठकीमध्ये ते पदाधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेणार आहेत आणि पक्षाची पुढील भूमिका उत्तर महाराष्ट्र मध्ये काय असेल याबाबत चर्चा करणार आहेत त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande