पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधारकांनी मतदार नोंदणी करावी - जिल्हाधिकारी
परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरू
पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधारकांनी मतदार नोंदणी करावी- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)।

01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरून पदवीधर मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. मतदार नोदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक (मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025), मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनर्प्रसिध्दी (बुधवार दि. 15 ऑक्टोबर, 2025), मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिध्दी ( शनिवार दि. 25 ऑक्टोबर, 2025), प्रकरणपरत्वे नमुना 18 किंवा 19 द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक (गुरुवार दि. 6 नोव्हेंबर, 2025), हस्तलिखित तयार करणे व मतदार याद्यांची छपाई (गुरुवार दि.20 नोव्हेंबर, 2025), प्रारुप मतदार या‌द्यांची प्रसिध्दी (मंगळवार दि. 25 नोव्हेंबर, 2025), दावे व हरकती स्वीकरण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) ( मंगळवार दि. 25 नोव्हेंबर, 2025 ते बुधवार दि. 10 डिसेंबर, 2025), दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे (गुरुवार दि. 25 डिसेंबर, 2025), मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी (मंगळवार दि.30 डिसेंबर, 2025).

नोंदणीसाठी पात्रता : 01 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा पूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. सर्व विद्यापीठे तसेच सर्व मुक्त विद्यापीठे, कोणत्याही अभिमत विद्यापीठाचा पदवीधर.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : फार्म नंबर 18 भरुन द्यावा. फार्म 18 सर्व तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे. फार्म नंबर 18 सोबत अंतिम वर्ष गुणपत्रिका किंवा मुळ पदवीची छायांकित प्रत जोडावी. नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो (फोटोचा पार्श्वभाग पांढ-या रंगाचा असावा.) रहिवासी पुरावा - आधार कार्ड, निवडणुक ओळखपत्र, रेशन कार्ड, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, घरप‌ट्टी यापैकी एक असावा.

ऑफलाईन 18 नंबर फार्म स्विकृती : सर्व महसूल मंडळ, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, शैक्षणिक संस्थेतील नोडल अधिकारी या ठिकाणी स्विकारण्यात येणार आहे. मतदार यादीमध्ये ऑनलाईन नोंदणी करणेसाठी https://mahaelection.gov.in या लिंकचा वापर करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande