रत्नागिरी : अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी 'जल हे विश्व' कार्यक्रम
रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ (ठाणे) आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळातर्फे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन व त्याचा लाभ याबाबत लोकक
रत्नागिरी : अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी 'जल हे विश्व' कार्यक्रम


रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ (ठाणे) आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळातर्फे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन व त्याचा लाभ याबाबत लोककला आणि लोकनृत्य यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम येत्या १३ ऑक्टोबर रोजी 'जल हे विश्व' आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पाचल येथील प्रभावती हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा अर्जुना प्रकल्प मार्गी लागला असून त्यामध्ये अंशतः करक आणि पूर्णतः पांगरी या गावांचे विस्थापन झाले आहे. समस्त प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून त्यांच्या मालमत्तेची नुकसानभरपाई यापूर्वीच देण्यात आले असून चार ठिकाणी पुनर्वसन वसाहत स्थापन करण्यात आली आहे. त्या ठिकाणी समस्त प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन करण्यात आले आहे. अर्जुना प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने बंदिस्त पाइपलाइनमधून परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या भातशेतीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. ते काम मार्गी लागले असून अर्जुना प्रकल्प अंतर्गत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे. पाण्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

'जल हे विश्व ' असे कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यासाठी लोककला आणि लोकनृत्य आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अर्जुना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत समाविष्ट असलेल्या आजूबाजूच्या सरपंचांना कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande